Stock Market Quotes ( प्रत्येक ट्रेडरला )

कुठले ही यशस्वी व्यक्तीचे काही म्हंटलेले उत्तेजक शब्द कानावर पडताच संपूर्ण शरीरात एक नवीन जोश भरून जात. विशेषकर, जेव्हां तुम्ही ट्रेडिंगची सुरुवात करता, तेव्हा नुसतं ज्ञान पर्याप्त नसत, योग्य प्रेरणा सुद्धा तुम्हाला काही नवीन मार्गावर पाऊले वाढवण्यास मदत करते. आज आपण प्रसिद्ध अशे 7 प्रेरणा देणारे सुविचार पाहूया जे प्रत्येक ट्रेडरला साठी प्रेरणादायक आहेत. 

१. “कुठल्याही परिस्थितीत स्वतःला मर्यादित करा जेणेकरून तुमच्या निर्णयाला मार्गदर्शन करण्यासाठी तुमची प्रमुख वृत्ती भीती नसली पाहिजे” – जॉय विडीच 

ट्रेडिंग मध्ये, तुम्ही कधीपण हरू शकता, किव्हा कधीपण जिंकू शकता. पहिल्यांदा ट्रेडिंग करणारे ९०टक्के ट्रेडर्स अपयशी होतात. ह्या मागील कारण काय आहे? भावनात्मक संबंध या मागील मुख्य कारण असू शकत. आणि कां? एक ट्रेडर म्हणून, आपल्याला सतत पैसे गमवण्याची भीती असते आणि ह्या कारणाने तुम्ही भावनात्मक दृष्टिकोण हरवून बसता. सहसा, ह्या क्षेत्रात पैसे हरण्याच्या भीतीने ट्रेडरच आपल्या कामा सोबत भावनात्मक संबंध बनतात. जॉय विडीच च्या वरील दिलेल्या सुविचार प्रमाणे, आपण जोपर्यंत १०० टक्के स्वतःला काही गमावण्याच्या परिस्थितीत आरामदायक नाही करून घेत तोपर्यंत आपल्याला प्रत्येक परिस्थितीत मर्यादित राहणे गरजेचे आहे. एकदा तुम्ही कुठल्याही परिस्थितीत सहज झालात त्यानंतर तुम्हाला भावनिक दृष्ट्या तडजोड किव्हा जास्त काळ अपयश सहन करावे नाही लागणार. 

२. “कुठल्याही सफल ट्रेडरचे मुख्य ध्येय आपले व्यापार उत्तम बनवणे असते. पैसे कमवणे हे दुसरे उद्देश्य”. – अलेक्झांडर एल्डर

उत्तम व्यवसाय करणे हेच कुठल्याही ट्रेडरचे मुख्य लक्ष्य आणि प्राथमिकतेत येतात. कोणीही बाजारात पैसे कमवण्यासाठी प्रवेश करतो तर तो फक्त त्याच्या जवळ असलेल्या क्षमते मुळे त्याचा काही भागच बनवतो. प्रत्येक ट्रेडरला हे माहित असणे गरजेचे आहे कि ट्रेडिंग हे एक उच्च तबक्याच्या खेळे प्रमाणे आहे आणि ह्यात पुढे वाढण्यासाठी तुमचे कौशल वापरणे, लक्ष केंद्रित करणे आणि शिस्त बाळगणे गरजेचे आहे. जस एक खेळाळू आपल्या खेळत उत्तम प्रदर्शनासाठी सतत शिकत असतो, तसेच सतत काही नवीन शिकून आपल्या कामात कसे वेगडेपणा आणता येईल हे हि एका ट्रेडरला बघायला हवे. हे तुम्हाला उत्तम व्यापार करण्यास मदत करेल आणि एकदा तुमचे व्यापार वाढण्यास सुरुवात झाली कि पैसा स्वतःहून तुमच्या जवळ येईल. प्रत्येक ट्रेडरचे पैसे कमवण्याचे उद्देश्य नंतर असून प्राथमिक उद्देश्य उत्तम व्यवसाय करणे असले पाहिजे. 

३. “तुम्ही काय करत आहात ह्याची माहिती नसणे मोठे जोखिम आहे”. – वॉरेन बफे

हे सुविचार एका संपन्न व्यक्ती आणि प्रख्यात व्यवसायीचे आहे. वॉरेन बफे प्रमाणे, एका जुगार खेळणाऱ्या पासून ट्रेडरच्या व्यक्तित्वाला वेगडे दाखवणे हे रिस्क मैनेजमेंट आहे. प्रत्येक ट्रेडरला आपले पैसे वाचवण्यासाठी रिस्क मैनेजमेंटची माहीत असली पाहिजे. कुठल्याही व्यवसायात हात टाकण्या आधी त्याची दोन्ही बाजूची जाचणी करायचा सल्ला सर्व तज्ञ देतातच, तसाच ट्रेडिंग करताना ह्याच्या चांगल्या किव्हा वाईट बाजू ची माहिती तुम्हाला पुढे वाढण्यास मदत करते. तुम्हाला ह्याची माहिती असली पाहिजे कि तुम्ही काय करत आहात आणि ह्याची योजना सुद्धा बनवा. माहिती असल्याने जोखीमेची भीती कमी असते.  

४. “मोठी जोखिम म्हणजे जोखिम न स्वीकारणे. ह्या सतत बदलणाऱ्या जगात, ती योजना जी तुम्हाला हरवते ती म्हणजे जोखिम न स्वीकारणे”. – मार्क झुकरबर्ग 

नेहमी लक्षात ठेवा ट्रेडिंगची नेहमी दोन बाजू असते, जिंकणे आणि हरण्याची आणि हे खेळाचेच एक भाग आहे. जेव्हा आपण जोखिम स्विकारतो, तेव्हां शक्यता दोन्हीची असते आपण जिंकतो किव्हा हरतो. ट्रेडिंग मुळे तुम्ही पैसे कमवू पण शकता आणि हरू पण शकता. पण जर तुम्ही जोखिम नाही घेतली तर पैसे कमवण्याची शक्यता कमी होते. जेव्हा तुम्ही व्यापार करता, मागील परिस्थितीतून शिकता तेव्हां येण्याऱ्या परिस्थितीला तेव्ह्ळ्याच उत्कटतेने बघता. हरणे किव्हा जिंकण्याची परिस्थिती तुम्हाला काही शिकून पुढे वाढन्यास मदत करते, म्हणून जोखिम स्वीकारा. 

५. “ह्या खेळात टिकून राहणारे सर्वात बलवान किंवा सर्वात हुशार पेक्षा बदल चांगल्या प्रकारे स्वीकार करणारे असतात”. – चार्ल्स डार्विन

स्टॉक मार्केट मध्ये सतत बदल होत असतात. जी प्रक्रिया आणि तकनिक तुम्ही आज वापरात आहात ती दुसऱ्या दिवशी किव्हा आठवड्यात कामास नाही येणार. बदल हे अपरिहार्य आहे, विशेषतः जेव्हां तुम्ही स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग करत असाल. फायदेशीर व्यापार साध्य करण्यासाठी एक प्रभावी व्यापार युक्ती म्हणजे विविध व्यापारी वातावरणाशी जुळवून घेणे. ह्या सुविचार प्रमाणे, एक व्यक्ती जो हुशार आहे किव्हा बलवान आहे तो बाजारात नाही टिकू शकणार. ज्याला हे माहित आहे कि बदलाला कसे सामोरे जायचे तोच व्यक्ती ह्या बाजारात टिकू शकतो. 

६. “पैसे बनवण्यावर लक्ष देऊ नका, जे आहे ते वाचवण्यावर लक्ष द्या”. – पॉल ट्यूडर जोन्स 

एक व्यवसायी म्हणून, आपली साचवलेली पुंजी सुरक्षित करणे प्राथमिकता आहे, पैसे बनवणे नाही. अन्य व्यवसायी सारखे, व्यापारातून वास्तविक नफा मिळवण्यासाठी पैसे कमवण्याचे वेड बाळगू नका. स्टॉक मार्केट मध्ये पैसे हरणे खूब सहज आहे आणि परत कमवणे तेव्हडेच कठीण. म्हणून तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. तुम्ही ज्या हालचाली करत आहात त्याने तुम्हाला पैसे कमवतायेतील कि नाही? तुम्ही फक्त तुमच्या जवळ असलेल्या पुंजीलाच तर वाचवत नाही आहात न? एक ट्रेडर म्हणून, तुम्हाला पैसे कमवण्या आधी तुमच्या जवळ असलेले वाचवणे जास्त गरजेचे आहे. ह्या प्रमाणे तुमच्या जवळ असलेली तुमची जमापुंजी सुद्धा सुरक्षित राहील आणि तुम्ही अजुन त्याला व्यापाराने वाढवू शकता. 

७. “मला माहित आहे कि सुरुवात केल्यावर मला कुठे थांबायचे आहे.” – ब्रूस कोवनेर 

हे सुविचार ब्रूस कोवनेरचे आहेत ज्यांच्या बद्दल प्रत्येक ट्रेडरला माहित असले पाहिजे. स्टॉक मार्केट मध्ये निवेश करण्या अगोदर तुम्हाला थांबण्याचे बिंदू म्हाईत असले पाहिजे. स्टॉक मार्केट मध्ये काय आर्थिक लाभ मिळत आहे ह्यासोबत तुमचे भावनात्मक जुडाव असणे हि एक सामान्य चूक आहे जे लोक करतातच. ह्या मुळे त्यांना फायदेच्या जागी हानी पत्कारावी लागते. ह्याला टाळण्यासाठी, तुम्हाला निवेश करण्या आधी त्यातून निघण्याचे मार्ग माहित असले पाहिजे. ह्या मुळे, बाजारपेठ वर जात असो किव्हा खाली, जो पर्यंत ग्राफ तुमच्या बंद करण्याच्या बिंदू पर्यंत नाही पोहचत, तुम्ही विक्री नाही करू शकणार आणि बाजार तुमच्या विरोधात येण्या आधी तुम्ही तुमचे स्थान बंद करू शकता. 

शेवटी 

हे ते ७ सुविचार आहे ज्यांच्या बद्दल प्रत्येक ट्रेडरला माहित असणे गरजेचे आहे. हे लक्षात ठेवा ट्रेडिंग हे एक अवघड खेळा सारखे आहे ज्यात तुमचे कौशल, शिस्त आणि लक्ष असण्या सोबत भरपूर माहिती असणे सुद्धा जरुरी आहे. फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये, तुमचे जास्तीत जास्त पैसा कमवण्याची भावना तुम्हाला पुढे नाही वाढू देणार. जस कुठले हि खेळ खेळल्या नन्तरच शिकता येतात पुस्तकातून नाही तसेच ट्रेडिंग सुद्धा तुम्ही तुमच्या अनुभव आणि केलेल्या चुकांमुळेच शिकू शकता. तर आपले पहिले पाऊल उचला आणि जर तुम्ही जिंकत असाल, तर मागे वळू नका. जर तुम्ही हरत असाल तर तुम्ही कुठे चुकत आहात हे माहित करा आणि भविष्यात ते पुन्हा न हो ह्याची खात्री ठेवा.