Hold Yourself Accountable to New Year's Resolutions

तुम्ही सुद्धा नवीन वर्षात केले निश्चय वर्ष सरता विसरता आणि मग पुन्हा पुढील येणाऱ्या वर्षात त्याची जवाबदारी घेता? असं होतं, पण हे तुमच्या जीवनावर अनेक प्रभाव टाकते, ज्यात पहिली पायरी आहे बेजवाबदारपण्याची, तुम्ही तुमच्या शब्दाला किती महत्व देता हे सुद्धा ह्यावरून निश्चित केले जाते. आपले निश्चय दृढ असेल तर तुम्ही तुमचे स्वप्न किव्हा कुठल्याही हि सवयीत बदल करण्यास सक्षम व्हाल, म्हणून हे ब्लॉग तुम्हच्यासाठी काही तुमच्या कामाची बाब घेऊन आले आहे ज्यात तुम्ही तुमचे निश्चय कसे लक्षात ठेवायचे आणि त्यान्ना पूर्ण करून कसे यशस्वी व्हायचे ह्याची माहित मिळवाल. सोप्या भाषेत सांगितले तर, आम्ही तुम्हाला जवाबदार बनवायचे सोपे मार्ग आणले आहेत. तर चला वाचू या. 

१. जे करायचे आहे त्याची यादी बनवा 

Write it down

अनेक वेळा आपण कोणालातरी काही गोष्टी सांगतो आणि विसरतो, ह्यात सर्वात जास्त गोंधळ स्त्रियांचे होतात घरातील हिशोब लक्षात ठेवतासताना. तर त्यावेळी ते त्या हिशोबाची यादी बनवतात आणि लक्षात ठेवतात कि कुठे किती खर्च केला आहे. हेच तुम्ही तुमचे निश्चय लक्षात ठेवण्यास सुद्धा वापरू शकता, तुम्ही जे हि विचार केले आहे जस, मी ह्यावर्षी आपल्या आरिग्यावर लक्ष देईन किव्हा मी माझ्या स्वभावात हि सुधारणा करिन आणि असे अनेक. तर ह्याची आदी बनवा हि तुम्हाला लक्षात ठेवण्यास मदत करेल आणि हि यादी तुम्ही अश्या ठिकाणी सुद्धा चिकटवू शकता जिथे तुमचे रोज लक्ष जाते, जस तुमच्या कपाटाचे दार, किव्हा कांच. अशी जागा जिथे तुम्ही रोज त्याला बघू शकता आणि ती तुमच्या दिवसाच्या सुरुवाती पासून ते रात्री झोपायला जाण्यापूर्वी सुद्धा तुमच्या नजरेत येईल. 

२. पूर्ण करू शकणारे ध्येय निश्चित करा 

Set realistic expectations

कित्तेक वेळा आपण फक्त दुसऱ्यांचे बघून अश्या गोष्टींना हाती घेतो ज्याला पूर्ण करणे अशक्य ठरते आणि मग पश्च्याताप करतो कि मी असे कां म्हंटले. म्हणून असे ध्येयाचे निश्चय करा जे तुम्ही पूर्ण करू शकाल आणि ते पूर्ण करण्याची शक्यता सुद्धा असेल. जस तुम्ही विचार केलेत कि मी ह्या वर्षी माझे घर घेईन पण त्यासाठी तुमच्या जवळ तेव्हडे पैसे नाही तर ते तुम्ही तुमच्या साहुलीयती प्रमाणे सुद्धा करू शकता जस मी माझे घर करिन पण त्यासाठी आधी माझ्या महिनतीचे ५ वर्ष त्यात देईन. 

३. तुमच्या कॅलेंडर मध्ये नोंदणी करा 

Schedule it in your calendar

काही निशचय केलेली गोष्ट मार्गस्थ झाली किव्हा त्यात काही नवीन घडले तर त्याची तुमच्या कॅलेंडर मध्ये नोंदणी नक्की करा. जस तुम्ही तुमचे काम पुढे वाढवण्यास कोणासोबत भेटलात आणि त्याने तुमच्या कामात मदत करण्यास एक निश्चित तारीख दिली तर ती चिन्हित करा. जी तुम्हाला तुमच्या कामाची आठवण देत राहील. 

४. नकारात्मकतेचे प्रवेश टाळा 

Remove negative influences from your life - New Year's Resolutions

कुठल्याही कामात नकारात्मकता हि काम बिघडवेलच म्हणून नेहमी तुमचे दृष्टिकोन सकारत्मक असले पाहिजे. तुम्ही आपल्या आजू बाजूला सुद्धा असे व्यक्ती जे काही वाईट विचार करणारे किव्हा नेहमी कुठल्याही गोष्टीत चूक काढणारे असतील त्यांच्या सोबत अति संवाद टाळा. नेहमी ऊर्जा मिळवणारे काम जस व्यायाम करा, कोणा प्रभावी व्यक्तिमत्वासोबत संवाद साधा हे तुम्हाला नक्कीच पुढे वाढण्यास मदत करतील. 

५. स्वतःला बक्षीस द्या

Reward yourself

कुठलेही काम करत असताना कोणी दुसऱ्या व्यक्तीने आपली स्तुती केली पाहिजे, आपण हि अपेक्ष करतो. पण कधी स्वतःला बक्षीस दिले आहेत का? नाही न. तर आता ते करा, स्वतःला तुमच्या केलेल्या कामाचे कौतुक करण्यास परवानगी द्या. ह्याने तुमचे काम पूर्ण होण्याची शक्यता वाढेल आणि तुम्ही अजून झुंझीने ते काम कराल. 

६. काही सक्रिय पायऱ्यांचे पाठपुरावा करा 

Follow through with action steps

कोणी सांगितले कि बाबा तू जे करत आहे ते चूक आहे, तर त्यावर लक्ष द्या. तुमची एक चूक तुम्हाला मागे करू शकते. म्हणून शक्यतो चुका टाळा आणि करतही असाल तर त्यातून शिका आणि त्याला आपल्या कामात वापरा. जितकी तुमची कल्पना उत्तम असेल तितके तुमचे काम आणि तितके त्याचे निष्कर्ष. 

कुठलेही काम हाताळताना ते किती काळात किती महिनती सोबत आणि किती मदतीसोबत पूर्ण होईल हे समजणे गरजेचे आहे म्हणून तुम्ही कोणतेहि काम किव्हा निसच्या केले असलेत तरी ते पूर्ण करणे हि तुमची जवाबदारी आहे. तुमची जवाबदारी जर चुकली तर तुम्ही आपल्या जीवनात पुढे नाही वाढू शकणार म्हणून निसच्या असे करा, जे तुम्ही हाताळू शकाल आणि त्याला तुमच्या जीवनात पूर्ण करू शकाल.